आज वाटते आई तुझ्या जवळ येऊन बसावे |
मांडीवर डोक ठेऊन तुझ्या शांतपणे निजावे |
घरापासून दूर म्हणून शांत झोपच येत नाही |
तुम्हा सर्वांची आठवण मला झोपूच देत नाही |
दिवस माझे सखे , आणि रात्री वैरी होतात |
त्या एकांतात मला फक्त चंद्र तारे साथ देतात |
प्रतेक तुटत्या ताऱ्याकडे मी परतीचे मागणे मागतो |
शीतल त्या चंद्रामध्ये मी तुझेच प्रतिबिंब पहातो |
आठवतो कधी तुझे संस्कार , कधी बाबांचा धाक |
कधी तुझी गोड ममता आणि कधी बाबांचा राग |
पुन्हा एकदा रस्त्याने तुझे बोट धरून चालावे |
चालताना लागली ठेच तर तुझ्या आधाराने सावरावे |
आज वाटते आई तू पुन्हा मला थोपटावे |
त्याच बोबड्या स्वरांत काही माझ्या साठी गुणगुणावे |
.......................................................कविकुमार
khupch chhan
ReplyDeleteaaichi athavan yete...