Monday 17 December 2012

-:( फाटल आभाळ ):-


अशी वेदना मनाची
कुणाला ती सांगवेना
अस फाटल आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।धृ।।


झेप घेतली आकाशी
बांध फुटले नभाचे
नाते तुटले घराशी
असे भोग नशीबाचे
झाली फसगत माझी
कुणाला ती बोलवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।१।।

आला पुर भावनेचा
हरी नामाचा जागर
तुझ्येविणा माझे बाई
कडू लागती भाकर
ये गं परतूनी आता
याद तुझी सोसवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।२।।

का तू दिली अशी शिक्षा
मी ग गुन्हा काय केला
घोट विशाचे घेवुन
बाळा मोकळा तू झाला
असे वादळ दुःखाचे
हृदयाला पेलवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।३।।

अशी वेदना मनाची
कुणाला ती सांगवेना
अस फाटल आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।धृ।।

- कविकुमार
(१५।१२।१२)




Tuesday 11 December 2012

-:( कोण आहे ):-




गजल 


कायद्याने चालणारा कोण आहे ? 
दोष त्यांचे काढणारा कोण आहे ? 


आज रांगेने उभे हे भ्रष्ट नेते 
सभ्यतेने वागणारा कोण आहे ? 


शरदचंद्राचे ऋतू बहरुन आले 
त्याच जैसा वागणारा कोण आहे ? 


मायदेशाचेच नेते झोपलेले 
धोरणाने जागणारा कोण आहे ? 


जीवनाचे प्रश्न सारे ऐरणीवर 
या व्यथांना मांडणारा कोण आहे ? 


सोनिया बघ या 'कुमाराला' जरा तू 
तूच माझी सांगणारा कोण आहे ? 


कविकुमार - 
(१२।१२।१२)

Thursday 6 December 2012

-:( प्रत्येक क्षण जपलेला ):-







हृदयात तुझ्या सखे 
जीव माजा दडलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


तु गुलाबाचं फुल जरी 
मी निवडुंगाचा काटा होतो 
तु माझी नव्हतीस परी 
मी नक्कीच तुझा होतो 
होकारात तुझ्या सखे 
ञान माझा लपलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रतेक क्षण जपलेला 


निस्वार्थ माझे प्रेम तरी 
विरह वाट्याला आला 
अंधळा माझा विश्वास 
फक्त हाच गुन्हा झाला 
रोज डाव जिँकनारा सखे 
तुझ्याचसाठी हारलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


एकच आस उरलीय आता 
मी तुलाच विसरुन जावे 
दिल्यात खोलवर यातना तु 
मी त्यातच प्रेम शोधावे 
मी पुर्ण तुझाच होतो सखे 
तु केसाने गळा कापलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


हृदयात तुझ्या सखे 
जीव माझा दडलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


प्रत्येक क्षण जपलेला . . . . !! 


- कविकुमार 
(६।१२।१२)

Sunday 2 December 2012

-:(आज बघतो):-


गजल 


हातात सुर्य आता घेऊन आज बघतो 
कैदेत चंद्र तारे ठेवून आज बघतो 


परकेच लोक आता मज आपलेच वाटे 
त्यांच्याच सोबतीने राहून आज बघतो 


न्यायालयात होते सन्माननीय जंतू 
हे घाव जीवघेणे दावून आज बघतो 


हा डाव जिँकताना मी हारलो तरीही 
ते दुःख अंतरीचे सोसून आज बघतो 


आता तिच्या सुखाची होती अजब कहाणी 
हे दुःख आसवांचे वाहून आज बघतो 


या सोनियास सांगा आहे कुमार त्यांचा 
मैफील जीवनाची गाऊन आज बघतो 


- कविकुमार 
(२६।११।१२)




Friday 9 November 2012

-:( एकांत सोबतीला ):-




लावु कसा मी आता 
हिशोब आठवांचा 
मनात दाटलेला 
पाऊस भावनांचा 


कर्तव्यनिष्ठ नाती 
सुखात व्यापलेली 
दुःखात यातनांच्या 
पुरती दुरावलेली 


मज वाटला दुरावा 
आता जरी जरासा 
कवटाळतो नभाला 
परका तरी जरासा 


हा खेळ नियतीचा 
माझ्याच वाटनीला 
भोगावयास उरला 
एकांत सोबतीला 


- कविकुमार 
(७।११।१२)

-:( आठवांच्या वेदना ):-

गजल 



आठवांच्या वेदनेला बांधले मी छावणीला 
त्या क्षणाच्या जिँदगीशी खेळतो मी रासलीला 


दूर माझ्या तू जरीही याच हृदयी सोबतीला 
आसवांचे दुःख सारे चिकटलेल्या पापणीला 


जिँकलेली तू मला पण मी कुठे गं हारणारा 
भावनांशी झुंजताना सावरे या पाकळीला 


संपली माझी प्रतीक्षा पण तरी एकांतता का ? 
धूर्त या भोळेपणाची का बसवली कोणशीला 


कोण कुरवाळुन गेले रे "कुमारा" सोनियाला 
बैसले आयुष्यभर मी आज त्याचा राखणीला 


- कविकुमार 
(२।११।१२)


-:( प्रामानीकपना ):- मराठी लेख


नुकताच घडलेला प्रसंग सी . एस . टी . मुंबई 

मी ऑफिसवर येवुन थांबलो रोजच्या प्रमाने कांता आजी झाडलोट आणि लादी पुसायला आल्या. अद्याप सर आले नाही म्हणुन आँफीसात एकटाच होतो 

कांता आज्जीँची प्रकृती आज ठीक वाटत नव्हती म्हणुन मी म्हणालो आजी आज राहुंद्यात मी झाडलोट करतो सरांना तुम्हीच केली म्हणुन सांगेल 

वयाची ७० वर्षे पुर्ण केलेल्या कांता आज्जीँनी साफ नकार दिला मला म्हणाल्या "नको ! माझ काम मला करूदेत बाळा , त्यांना फसवुन माझ्या प्रामानिकतेवर बोट उठवेल माझ मन. 

या वयातही कामावरती इतकी निष्ठा पाहून मन अगदि भरून आलं 
मग आपली निष्ठा कोठे हरवली ?
आपले संस्कार कसे गोठले 
प्रतिभेचा खेळ मांडण्याइतके शंड आहोत का आपन 

 आज प्रामानीकतेचा महासागर डोळ्यांत डाटलाय , कांता आजीँच्या या धड्याला मनापासुन हँट्स आँफ !! 

-कविकुमार

-:[ उगाच मन सुखावते ]:-


तुझ माझ्याशी नात 
अस कस हे आहे ? 
कोण आहे तुझा मी 
माझी कोण तु आहे ? 


छीटकारतो तुला मी 
वेदना मलाच होते 
पाहतोच सुख तुझे 
पन दु:ख मलाच होते 


दुरव्यातही तुझीच आस 
एकांतही तुझाच भास 
लागलेली ठेच मला अण् 
फुंकर म्हणुन तुझाच श्वास 


जवळीक देइल वेगळेच वळन 
मला याचीच भिती वाटते गं 
दुरच सही, पन सुखी राहू 
आता असेच मला वाटते गं 


जाता जाता फक्त आता 
इतकेच मला सांगशील का ? 
या नात्याला मैञी म्हणुन 
नाव पुरेस नव्हतच का ? 


हार माझी मान्य परी 
तु माञ जीँकलीच नाहीस 
किमान माझी मैञी तरी 
तुतर समजु शकलीच नाहीस 


वचन माझे तुटनार नाही 
याद तरी तुलाच पुकारते 
जीँकुनही हार मानन्यास 
आज उगाच मन सुखावते 


आज उगाच मन सुखवते . . . । 


-कविकुमार 
[१२।८।२०१२ , १०:४०PM ]


-:( अंधार ):-



गजल 



रातीस का मिळाला अंधार वाटणीला 
हे भाग्य लाभलेले माझ्याच चांदणीला 


जिँकून हारलेला प्रत्येक थेँब माझा 
आलाच पूर एसा भेटून पापणीला 


एकांत झोपनारा तो चंद्र सोबतीला 
तारेच फक्त होते आकाश राखणीला 


या साखरात शाई पाहून धंन्य झालो 
लिहीण्यास कागदावर दे साथ लेखणीला 


हा गंध सोनियाचा होता ' कुमार ' त्यांचा 
अजन्म सोबतीने राहिल 
राखणीला 


- कविकुमार 

[ १।८।२०१२ , १२:३३AM ] 

"लाँजीक"


आपन प्रत्येक गोष्टीत नेहमीच 
"लाँजीक" का शोधत असतो ? 


काही अनलाँजीकल गोष्टिँमध्ये 
फक्त आनंद शोधावा 


जीवन आधीक सुंदर वाटत 


-कविकुमार 
[३१।७।२०१२ , ५:५६PM]

नशीब :-


नशीब , नशीब म्हणजे काय असत ? 


आपनच आपल्या कृतीने लिहीलेल 
आपल्याच भविष्याच पुस्तक 


जी माणसे विचारांनी तेजस्वि असतात 
त्यान खुप काही चांगल मीळत सुद्दा 


विचार आणि कर्म वाईट 
त्याचे भविष्यही वाईटच मार्ग पकडनार 


मग मनासारख घडल नाही की 
पुन्हा नशीबाला दोष देनार 


पन एक गोष्ट लक्षात ठेवा 
हस्तरेषांहुन जास्त हस्तकर्तुत्वावर विश्वास ठेवा 


आयुष्य खुपच सुंदर आहे 
भविष्य आपल्याच हातात आहे 


- कविकुमार 
(२५।७।२०१२)

-:( पूर ):-


गजल 


यादेस आज तुझीया भलताच नूर आला 
मीटता चुकून डोळे स्वप्नास पूर आला 


तालास साथ देण्या कंठात प्राण नाही 
कामास आज माझ्या परकाच सूर आला 


छायेस शोधताना चटके उन्हात बसले 
सुर्यासही पहा त्या ग्रहनात ऊर आला 


देतास घाव मजला केला प्रयास त्यांनी 
भोगावया गुन्ह्याला भलता चतूर आला 


बघ सोनिया कुणाची प्रश्ने 'कुमार' पुसतो 
या जिँदगीत माझ्या सल्ला फितूर आला 


-कविकुमार 
(२२।७।२०१२ , १२:३३ AM)



-:( परोपकार ):-







इतरांना सुगंध देन्याकरता 
का फांदीपासुन तुटाव लागत ? 
इतरांना प्रकाश देन्याकरता 
का वातीला जळाव लागत ? 

काळोखाची राञ एकटी 
का चँद्राला जागाव लागत ? 
इच्छा माझी पुर्ण कराया 
त्या ताऱ्‍याला तूटाव लागत 

याद कुणाची येता मजला 
का आश्रुंना ओघळाव लागत ? 
तहान माझी होन्यासाठी 
रोज नदीला वहाव लागत 

राञीमागुन दिवस उगवला 
का सुर्याला तळपाव लागत ? 
श्वास माझा होन्यासाठी 
उगा हवेला पळाव लागत 

जीवनाची जिंकन्या लढाई 
क्षणा क्षणाला लढाया लागत 
निसर्ग वेडा मला सांगतो 
परोपकाराने जगाव लागत 

-कविकुमार 
(२४।६।२०१२, 1:18AM)

Friday 10 August 2012

-:( अट्टहास ):-

गजल

दडवला उशाशी तुझा ध्यास होता
तुझे प्रेम होते की आभास होता ?

कशालास तु सोडीलेस हाथ माझे ?
अरे ठेवीलेला तो विश्वास होता

तुझ्या आठवांचा ना सुकला झरा
कसा कोँडलेला तुझा श्वास होता ?

मनालाच मी तर किती सावरावे ?
अनावर कसा हाच हव्यास होता ?

अरे सोनियाच्या 'कुमारास' सांगा
तीला मीवन्यासाठीच हा ध्यास होता


-कविकुमार
(७।७।२०१२ , १०:३२PM)


Tuesday 12 June 2012

-: चक्रव्युह विचारांचे :-




झाला सुळसुळाट येथे 
अस्तित्व मुळाचे संपले 
काँपी पेस्ट करुनिच 
नाव स्व:ताचे टाकले 

कवी लाचारा सारखे 
शोध घेतो चोरट्याचा 
कोणी चोरले हृदय 
कोणी काळीज फाडले 

कवितेला पंख आले 
तीच उडुनीया गेली 
जन्मदात्याचे ते ऋण 
तीच विसरुनी गेली 

मोठी वेदना मनाची 
पाणी डोळ्यांतुनी वाहे 
मुका समाज भोवती 
खेळ भावनेचा पाहे 

नको आता ही जखम 
नको सुगावा सुखाचा 
एक थीनगीच हवी 
शोध घ्याया सत्यतेचा 

चक्रव्युह वीचारांचे 
झाली शब्दांची लडाई 
घावे एक अभीमन्यु 
जीव गमावीला ठाई 

-कविकुमार 
(११।६।२०१२ / ३:१५ AM)

Saturday 9 June 2012

-:( र्‍हास ):-




गजल 

आयुष्य मांडताना भलताच त्रास झाला 
हृदयात ठेवलेला निशिगंध फास झाला 

या वादळात सारे माझे तुटून गेले 
संचित आठवांचा पाऊस खास झाला 

विरहास या तुझ्या मी दुःखास भोगताना 
आलीच वीज जैसी साराच र्‍हास झाला 

कल्लोळ माजलेला या काळजात माझ्या 
दुर्दम्य वेदनेने समृद्ध स्वास झाला 

ये रे 'कुमार' आता या सोनियाचसाठी 
अदृश्य भासणारा तो आसपास झाला 

-कविकुमार 
(३१ में २०१२)