Monday 17 December 2012

-:( फाटल आभाळ ):-


अशी वेदना मनाची
कुणाला ती सांगवेना
अस फाटल आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।धृ।।


झेप घेतली आकाशी
बांध फुटले नभाचे
नाते तुटले घराशी
असे भोग नशीबाचे
झाली फसगत माझी
कुणाला ती बोलवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।१।।

आला पुर भावनेचा
हरी नामाचा जागर
तुझ्येविणा माझे बाई
कडू लागती भाकर
ये गं परतूनी आता
याद तुझी सोसवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।२।।

का तू दिली अशी शिक्षा
मी ग गुन्हा काय केला
घोट विशाचे घेवुन
बाळा मोकळा तू झाला
असे वादळ दुःखाचे
हृदयाला पेलवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।३।।

अशी वेदना मनाची
कुणाला ती सांगवेना
अस फाटल आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।धृ।।

- कविकुमार
(१५।१२।१२)




No comments:

Post a Comment