Tuesday 12 June 2012

-: चक्रव्युह विचारांचे :-




झाला सुळसुळाट येथे 
अस्तित्व मुळाचे संपले 
काँपी पेस्ट करुनिच 
नाव स्व:ताचे टाकले 

कवी लाचारा सारखे 
शोध घेतो चोरट्याचा 
कोणी चोरले हृदय 
कोणी काळीज फाडले 

कवितेला पंख आले 
तीच उडुनीया गेली 
जन्मदात्याचे ते ऋण 
तीच विसरुनी गेली 

मोठी वेदना मनाची 
पाणी डोळ्यांतुनी वाहे 
मुका समाज भोवती 
खेळ भावनेचा पाहे 

नको आता ही जखम 
नको सुगावा सुखाचा 
एक थीनगीच हवी 
शोध घ्याया सत्यतेचा 

चक्रव्युह वीचारांचे 
झाली शब्दांची लडाई 
घावे एक अभीमन्यु 
जीव गमावीला ठाई 

-कविकुमार 
(११।६।२०१२ / ३:१५ AM)

Saturday 9 June 2012

-:( र्‍हास ):-




गजल 

आयुष्य मांडताना भलताच त्रास झाला 
हृदयात ठेवलेला निशिगंध फास झाला 

या वादळात सारे माझे तुटून गेले 
संचित आठवांचा पाऊस खास झाला 

विरहास या तुझ्या मी दुःखास भोगताना 
आलीच वीज जैसी साराच र्‍हास झाला 

कल्लोळ माजलेला या काळजात माझ्या 
दुर्दम्य वेदनेने समृद्ध स्वास झाला 

ये रे 'कुमार' आता या सोनियाचसाठी 
अदृश्य भासणारा तो आसपास झाला 

-कविकुमार 
(३१ में २०१२)

-: थोडाच राहिलो :-


गजल 

नवखाच राहिलो मी 
परखाच राहिलो मी 

जपले कितीक नाते 
न्याराच राहिलो मी

तू वाच रोज गजला 
मतलाच राहिलो मी

होते कुणी न येथे 
माझाच राहिलो मी 

ना सूर्य चंद्र आहे 
ताराच राहिलो मी

जाळून जिंदगीला 
थोडाच राहिलो मी

माझ्याच सोनियाच्या 
ह्रदयात राहिलो मी

आहे कुमार त्याचा 
त्याचाच राहिलो मी

-कविकुमार 
(३०-५-२०१२)