Monday 17 December 2012

-:( फाटल आभाळ ):-


अशी वेदना मनाची
कुणाला ती सांगवेना
अस फाटल आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।धृ।।


झेप घेतली आकाशी
बांध फुटले नभाचे
नाते तुटले घराशी
असे भोग नशीबाचे
झाली फसगत माझी
कुणाला ती बोलवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।१।।

आला पुर भावनेचा
हरी नामाचा जागर
तुझ्येविणा माझे बाई
कडू लागती भाकर
ये गं परतूनी आता
याद तुझी सोसवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।२।।

का तू दिली अशी शिक्षा
मी ग गुन्हा काय केला
घोट विशाचे घेवुन
बाळा मोकळा तू झाला
असे वादळ दुःखाचे
हृदयाला पेलवेना
असे फाटले आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।३।।

अशी वेदना मनाची
कुणाला ती सांगवेना
अस फाटल आभाळ
त्याला थीगळ पुरेना ।।धृ।।

- कविकुमार
(१५।१२।१२)




Tuesday 11 December 2012

-:( कोण आहे ):-




गजल 


कायद्याने चालणारा कोण आहे ? 
दोष त्यांचे काढणारा कोण आहे ? 


आज रांगेने उभे हे भ्रष्ट नेते 
सभ्यतेने वागणारा कोण आहे ? 


शरदचंद्राचे ऋतू बहरुन आले 
त्याच जैसा वागणारा कोण आहे ? 


मायदेशाचेच नेते झोपलेले 
धोरणाने जागणारा कोण आहे ? 


जीवनाचे प्रश्न सारे ऐरणीवर 
या व्यथांना मांडणारा कोण आहे ? 


सोनिया बघ या 'कुमाराला' जरा तू 
तूच माझी सांगणारा कोण आहे ? 


कविकुमार - 
(१२।१२।१२)

Thursday 6 December 2012

-:( प्रत्येक क्षण जपलेला ):-







हृदयात तुझ्या सखे 
जीव माजा दडलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


तु गुलाबाचं फुल जरी 
मी निवडुंगाचा काटा होतो 
तु माझी नव्हतीस परी 
मी नक्कीच तुझा होतो 
होकारात तुझ्या सखे 
ञान माझा लपलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रतेक क्षण जपलेला 


निस्वार्थ माझे प्रेम तरी 
विरह वाट्याला आला 
अंधळा माझा विश्वास 
फक्त हाच गुन्हा झाला 
रोज डाव जिँकनारा सखे 
तुझ्याचसाठी हारलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


एकच आस उरलीय आता 
मी तुलाच विसरुन जावे 
दिल्यात खोलवर यातना तु 
मी त्यातच प्रेम शोधावे 
मी पुर्ण तुझाच होतो सखे 
तु केसाने गळा कापलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


हृदयात तुझ्या सखे 
जीव माझा दडलेला 
आठवांचा तुझ्या मी 
प्रत्येक क्षण जपलेला 


प्रत्येक क्षण जपलेला . . . . !! 


- कविकुमार 
(६।१२।१२)

Sunday 2 December 2012

-:(आज बघतो):-


गजल 


हातात सुर्य आता घेऊन आज बघतो 
कैदेत चंद्र तारे ठेवून आज बघतो 


परकेच लोक आता मज आपलेच वाटे 
त्यांच्याच सोबतीने राहून आज बघतो 


न्यायालयात होते सन्माननीय जंतू 
हे घाव जीवघेणे दावून आज बघतो 


हा डाव जिँकताना मी हारलो तरीही 
ते दुःख अंतरीचे सोसून आज बघतो 


आता तिच्या सुखाची होती अजब कहाणी 
हे दुःख आसवांचे वाहून आज बघतो 


या सोनियास सांगा आहे कुमार त्यांचा 
मैफील जीवनाची गाऊन आज बघतो 


- कविकुमार 
(२६।११।१२)