Thursday 7 February 2013

गम (शायरी )


बेहेकने का गम उन हवाओँ से पुछो 
बिछडने का गम उन किनारोँ से पुछो 
रोशन जो करे अंधेरा एक पल के लीये 
जलने का गम उन चिरागोँसे पुछो 

उलझने का गम उन सवालोँसे पुछो 
झगडने का गम उन बहारोँसे पुछो 
सजाये जो सपने एक पल के लीये 
दुवाओँ का गम उन निगाहोँसे पुछो 

बरसने का गम उन घटाओँ से पुछो 
छलकने का गम उन कतारोँ से पुछो 
आरजु करे जो पुरी एक पल के लीये 
तुटने का गम उन सितारोँ से पुछो 

मोहोब्बत का गम उन दिवानों से पुछो 
तडपने का गम उन दिलोँ से पुछो 
करे जो नशा एक पल के लीये 
शबाबोँ का गम उन शराबोँ से पुछो 

मेहेकने का गम उन गुलाबोँ से पुछो 
बितने का गम उन जमानोँ से पुछो 
फना जो हो जाये इस देश के लीये 
गवाने का गम उन जवानोँ से पुछो 

कविकुमार - 
(४।२।१३)


-:( आकाश एक आहे ):-



हृदयात आजही ह्या
इरादा नेक आहे ।
चुकली दिशा तरीही
आकाश एक आहे ।।धृ।।

झुकली ना मान केव्हा
लाचार ना कधीही
जखमा आजुन ताज्या
गोँजारल्या जरीही
झाले असंख्य तुकडे
विश्वास एक आहे
चुकली दिशा तरीही
आकाश एक आहे ।।१।।

अजन्म टोचला तो
अध्याय कोरलेला
माझ्याच आप्तकांनी
लचकाच तोडलेला
रडलो ना तरीही
आधार एक आहे
चुकली दिशा तरीही
आकाश एक आहे ।।२।।

छायेस शोधताना
आले किती उन्हाळे
थंडी सरेल तेव्हा
येतात पावसाळे
झीजलो जरी मी थोडा
आयुष्य एक आहे
चुकली दिशा तरीही
आकाश एक आहे ।।३।।

हृदयात आजही ह्या
इरादा नेक आहे
चुकली दिशा तरीही
आकाश एक आहे ।।धृ।।

कविकुमार -
(५।२।१३)


Friday 1 February 2013

-:( स्वप्नात माझ्या ):-

गजल 
झोपताच राहते डोळ्यात माझ्या
का अशीच लाजते स्वप्नात माझ्या

गीत हे अनोळखी गाता न आले 
स्वर साज साचते कंठात माझ्या

वेग का मंदावला श्वासातला तो 
ती अशीच चालते हृदयात माझ्या

मी नशेत छेडतो त्या आठवांना
ती अशीच पाजते कैफात माझ्या

ये कुमार सांग माझ्या सोनियाला
रोज वाट पाहते रस्त्यात माझ्या

कविकुमार -
(१८।१।१३)