Sunday 27 January 2013

।। परखे स्वदेशी ।। (मराठी लेख)



     आज दि २६ जानेवारी २०१३ पहाटेच कचेरीत झेंडा वंदनासाठी गेलो होतो. अनेक शाळांतून विद्यार्थी पोलिसांची परेड पाहण्यासाठी जमले होते . शहरातील नामांकित मंडळी , शिक्षक , गावकरी असा तो माहोल होता ठराविक वेळेत झेंडावंदन पार पडले. त्यानंतरचा दिवस देशभक्तीपर चित्रपट , गाणी , मुलाखतींसोबत सरत होता एकंदरीत दिवस  खूपच छान गेला .

      सायंकाळची वेळ होती माझ्या फोनची रिंग वाजली , रिसीव्ह करताच समोरची व्यक्ती माज्याशी बोलू लागली मी गायत्री बोलतीये facebook वर आपण बोलतो आठवल ? मी हो म्हणालो , त्या पुढे बोलू लागल्या तुम्ही दोन दिवसापूर्वी facebook वर एक पोस्त टाकलेली कि लोक झेंडे घेतात पण काम पूर्ण झाल्यावर तेच झेंडे रस्त्यावर लोळताना दिसतात वेगेरे आठवल ? देशाचा एक जागृक नागरिक म्हणून राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ ती पोस्त मी टाकली  होती. प्रतिष्ठेमुळे मी केलेली प्रत्येक गोष्ट चर्चेचा विषय बनते हि गोस्त माज्यासाठी नवीन नव्हतीच हा फोन त्याच संधर्भात असावा अस वाटल मी गप्पच होतो मध्ये मध्ये "हो" 'नाही" अशी मोजकीच उत्तरे देत होतो थोड्याच वेळात त्यांनी त्यांचा दिनक्रम सांगायला प्रारंभ केला.

     मी राहणारी मुंबईतली सकाळी कोलोनीतील ध्वजवंदन करून class साठी बाहेर पडली काहीच अंतरावर तुम्ही त्या लेखात सांगितलेल्या अवस्तेत झेंडा दिसला तुमची पोस्त आठवली प्रत्येक शब्द कानात घुमायला लागला आणि त्या गोष्टीची शरम वाटली तुम्ही त्या लेखात सांगितल्या प्रमाणे मी तो ध्वज उचलला आणि सांभाळून ठेवला  त्यानंतर दिवस सरता सरता जिथे जिथे मला ध्वज रस्त्यावर दिसले ते ते मी गोल करत  आले .परतत असताना काही मित्रही माझ्या बरोबर होते त्यांच्या बोलण्यात हा एक पब्लिसिटी साठीचा sant होता तर माझ्यासाठी देशाची अब्रू ,मान ,प्रठीष्ठा पायदळी जऊ न देण्याची धडपड . आजचा दिवस सरला पण आता एकूण माझ्याकडे १२ ध्वज आहेत त्यातले काही तर तुटक्या फाटक्या अवस्थेतही आहेत . मी यांच काय करू ?? अस तिने मला विचारल , मी बराच वेळ स्तब्द होतो तरीही त्या प्रश्नच उत्तर देऊ शकलो नाही . मानत विचारांचं वादळ सुरु झाल .

     देशाच्या राष्ट्रध्वजाचा व्यवहार करणारे  त्याचा बाजार करतात घेणारे न राहून आपल्या देश भक्तीचा आव आणून दिखावा करतात , राजकारणी देशाच रक्त पितात , या भारतमातेचेच सुपुत्र तिचाच लिलाव करतात !! परप्रांतीय भारताकडे बोट दाखवतात त्यात खरच  तथ्य आहे . ज्यांना राष्ट्रध्वजाचा स्वाभिमान नाही ते कसले भारतीय ? यापेक्षा तो अस्वतंत्र भारत चांगला होता . काय या भारतात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य ह्या साठी उभारलं होत ? काय याच स्वातंत्र्यासाठी बळवंत फडके झिजले ? काय याच स्वातंत्र्यासाठी भगतसिंग हसत हसत फाशी गेले ? काय याच स्वातंत्र्यासाठी सावरकर झगडले ? काय याच स्वातंत्र्यासाठी आझादांनी मरण पत्करले ? राजगुरू , सुखदेव , महात्मा फुले , टिळक अगदी सगळ्या सगळ्यांचे बलिदान मातीमोल ठरावे इतके शंड भारतीय इथे कसे जन्माला आले ? देश आपला झाला हो पण आपुलकी नाहीशी झाली .

      या विचारचक्रात तो फोन केव्हा बंद झाला कळलाच नाही . या एकाच  लेखात मी देशच चित्र बदलुन दाखवेल अशी अशा नक्कीच नाही. पण किमान १ % स्वदेशी बांधवांच्या मनात खर्या क्रांतीची ज्योत पेटवण्यास यशस्वी झालो तरी माझ्या मायभूमीसाठी ती छोटीशी आदरांजली असेल .

।। जय हिंद ।। 

कविकुमार -
(२६।१।१२)
  

Tuesday 15 January 2013

-:( सोनेरी पहाट ):-



गुज दाटते  मनात 
सुमनांचा सारीपाट 
पहा उजाडली कशी 
एक सोनेरी पहाट 

सुर्य येतोय हळूच 
चंद्र
 निजला सुखात 
शृंगारली किरणांत 
एक सोनेरी पहाट 

रातराणी कोमेजली 
पाखरांचा किलबीलाट 
जाई-जुईचा सुगंध 
एक सोनेरी पहाट 

दवबिँदुत नहाली 
अंगनातली ती वाट 
पाणा फुलांवर मोती 
एक सोनेरी पहाट 

कविकुमार - 
(१६।१।१३)

-:( कधी कधी ):-


गजल 

मनातल्या मनात ती हासते कधी कधी 
मलाच तीच आपली वाटते कधी कधी 

क्षणात दूर वाटते ही उणीव वाटते 
उरातल्या उरात ती दाटते कधी कधी 

लगाव का मला असा लागला सखे तुझा 
नभातल्या ढगात ती भासते कधी कधी 

हवेत गंध दाटला मोगरा कुपीतला 
सुगंधल्या कळीत ती लाजते कधी कधी 

'कुमार' सोनिया तुला आपलेच मानतो 
कशास हात तू हळू मागते कधी कधी 

कविकुमार - 
(१४।१।१३)


Saturday 12 January 2013

-:( भाव ):-



गजल 
------------ 

नाव रे 
गाव रे 

घातला 
घाव रे 

हा कसा 
डाव रे 

का असा 
भाव रे 

तू पुन्हा 
धाव रे 

ही नको 
हाव रे 

कविकुमार - 
(६।१।१३) 

वृत्त : तडित 
माञा : ५ 
लगक्रम : गा ल गा

Sunday 6 January 2013

-:( मनाने ):-




गजल 

आज आकाशात जावे या मनाने 
वाटते त्याचेच व्हावे या मनाने 

दुर त्याला लोटले ना मी कधीही 
पाखरा जैसे उडावे या मनाने 

गात होता तो सूराने छान गाणे 
हरवलेले सूर गावे या मनाने 

ओढ कैली लागलेली भेटण्याची 
भेटूनीही तृप्त व्हावे या मनाने 

तो पुन्हा माझ्या सुखाशी भांडताना 
कोणते मी तर्क लावे या मनाने 

स्वप्न होते स्वप्न ते राहू नये रे 
जाग येताना पहावे या मनाने 

लाजली ती सोनिया बघ रे कुमारा 
याच आनंदात न्हावे या मनाने 

कविकुमार - 
(२१।१२।१२)