Tuesday 31 January 2012

!! रहस्य !!


गजल 

सुचते मनास माझ्या बोलून टाकतो मी ! 
हे दु:ख अंतरीचे मांडून टाकतो मी ! 

जेव्हा तरंग उठते त्या-त्याच भावनांचे 
आतूर लेखणीला उतरून टाकतो मी ! 

मोकाट कल्पनांचे सुटतात सर्प तेव्हा 
हे डंक साहवेना मारून टाकतो मी ! 

एकांततेच त्याचे आभार मानताना 
ज्याला नको महत्व देऊन टाकतो मी ! 

आहे 'कुमार' गजला सांगू नको कुणाला 
माझे रहस्य आता दाबून टाकतो मी ! 

-कविकुमार

Sunday 29 January 2012

-:( जीवघेनी थट्टा ):-


तुझ्या आठवनींना समजव जरा 
त्या नेहमी माझा पाटलाग करतात 
मैफिलीत जरी बसलो मी 
तरी त्या मला एकट करतात ।। 

सहवास तूझा नकोच मला 
फक्त थोडा अवकाश दे 
काळोखात हिँडतो मी 
फक्त थोडा प्रकाश दे ।। 

प्रेमाच्या या लढाईत 
मी पुर्णपणे हरवलो गं 
प्रयत्नांत विसरन्याच्या तुला 
मी एकांताशी भांडलो गं ।। 

फक्त एकच मागन आहे आता 
तेव्हड माञ नाकारु नकोस 
पुन्हा अशि जीवघेनी थट्टा 
दुस~या कुणाची करु नकोस ।। 

अपेक्षा करशील तू प्रेमाची 
पण प्रत्येकजन वफादार नसतो 
फुलाप्रमाने तूला जपायला 
प्रत्येकात कविकुमार नसतो ।। 

.......-कविकुमार 
(१९ जानेवारी २०१२ )


!! शोध !!




रखरखत्या या जीवनाच्या ऊन्हात 
थंड मायेचा पाझर शोधतो 

चटके सोसत असताना 
कुठेतरी प्रेमाची शितलता शोधतो 

तहानलेल्या व्याकूळ माझ्या डोळ्यांत 
सुखसागराचा गारवा 
शोधतो
 
आठवनीँच्या वेगवेगळ्या ऋतूंमधुन 
जून्या नात्यांची गरमी  
शोधतो 
.

हिवाळ्याच्या या कडाक्याच्या थंडीत 
मैत्रीची ऊब शोधतो 

काळाच्या ओघात पडून गेलेल्या पावसात 
क्षणांचे दवबिँदु शोधतो 

डोळ्यात येणा~या भरती ओहोटित 
गहिवरलेले मोती शोधतो 

दूस~यांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुले उमलवताना 
माझ्यातला मी आता मलाच शोधतो 

हृदयाच्या पडद्याआड डोकावून पाहताना 
माझ्यात दडलेला "कविकुमार" शोधतो 

..............कविकुमार

-:( एक कहानी लग्नाची ):-


भावबंध रेशमाचे 
त्याला जोड सोन्याची 
तुझ्या होकाराने लीहू शकेल 
मी नवि कहानी प्रेमाची 

सप्तर्षिच्या साक्षिने 
पकडू वेळ मुहूर्ताची 
आई बाबांच्या मंजुरीने 
छापु पञीका आमंञनाची 

गनरायाच्या पुजनाने सजवू 
स्वप्ने आपल्या लग्नाची 
न विसरता धाडू प्रत्येकाला 
विनंती त्या सोहळ्याची 

आतुरतेने वाट पाहून 
ती शुभघडी येईल जीवनाची 
फक्त दोघांच्या मध्ये असेल 
तेव्हा भिँत आंतरपाटाची 

मंगलाष्टकांच्या सुरांत बांधुया 
गाठ आर्ध्या आयुष्याची 
अग्निदेवतेच्या साक्षिने घेवूया 
शपथ सात जन्माची 

आदर्नियांच्या आशिर्वादाने 
धरू वाट सुखी संसाराची 
नक्षञांनी सजवूया 
एक गाडी प्रवासाची 

पुष्पकमलांनी पुर्ण असेल 
तयारी आपुल्या स्वागताची 
ओलांडून मापास सांडुदे 
रास त्या अक्षतांची 

पावलांनी लक्ष्मीच्या वाढेल 
शोभा माझ्या सदनाची 
श्वासात मीसळूनी श्वास 
रंगवूया ती राञ मधुचँद्राची 

-कविकुमार 
( १५ डिसेंबर २०११ )


-: नंतर केव्हातरी जगेल :-





बरेच प्रश्न पडतात पण
उत्तरे काही सापडेना !
आयुष्य एक कोड आहे पण
ते काही केल्या उमजेना !!

आई म्हणते जगन्याचा 
दृष्टिकोन बदलायला हवा !
बाबा म्हणतात आपला रस्ता 
आपनच शोधायला हवा !!


आई म्हणते सर्वाँशी 
प्रेमाने तू वागत जा !
निष्ठुर आहे जग पण 
तू आपुलकिने जगत जा !!


बाबा म्हणतात आता तू 
जीद्दीने लढायला हवं !
आयुष्य एक शर्यत आहे
तूला जिँकायलाच हवं !!


प्रेम आणि जीद्दीची 
ही गं कसली लढाई ?
विचार माझे स्तब्द होतात
हे कुणाला गं सांगु आई ?


विचारचक्रावर या 
मी कसा मिळवू ताबा ?
जिँकेल सा~या जगास 
थोडा विश्वास ठेवा बाबा !!


खरच सांगु आई आज 
खुप भीती वाटतेय गं !
मी फक्त एक थेंब आणि
जीवन आहे सागर गं !!


बाबा तुमच्या स्वप्नांसाठी
मी दिवस-राञ झगडेल !
माझ्या स्वप्नांसाठी माञ 
नंतर केव्हातरी जगेल !!


नंतर केव्हातरी जगेल . . . . .!!

.................-कविकुमार
                  23/12/2011



-:( फक्त एकच आठवन ):-









आयुष्याच्या तीजोरीमाडून 
चोरी झाली एके काळी 
शोध घेताना हृदयात सापडली
काही नाती गहिवरलेली 

आठवणींने गच्च भरलेल्या हृदयात 
काही स्वप्न सापडली हरवलेली 
अपूर्ण अशा त्या स्वप्नांच्या डोळ्यात 
एक अशा होती साठलेली 

हृदयाच्या एका कोपर्यात  
तुझी फक्त एकच आठवण होती 
"सुवर्णाक्षरात गिरवलेली"

....कविकुमार
२१-११-२०११ 

Saturday 28 January 2012

-: एक दगडाच मन दे :-

आजवर काही मागीतल नाही
पण आज एक वर दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . .।।

हजार वार होतात
आज या काळजावर
जवचेच सोडून जातात
अनोळखी वळनावर
नाती जशी तुच देतोस
त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।

आठवनी जवळ राहतात
त्यांच्या आनखी काही नाही
सावली सारख्या पाटलाग
करतात आनखी काही नाही
दिलास आता दुरावा तसेच
सहनशीलतेच बळ दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।

एकांताला आपल मानतो
आता मला कोणीच नको
मीच स्वत:ची समजूत घालतो
आता दुस~याला ञास नको
पण ज्यांनी दिल दु:ख मला
त्यांना भर-भरुन सुख दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।

ते दुर आहेत खुप माझ्या
तरी का ही ओढ आहे ?
सुखात असतील माझ्यावीना
हीच जानिव गोड आहे
त्यांच्या जीवनात आनंद
आणि हवतर मला दु:ख दे
हात जोडून मागतो देवा
एक दगडाच मन दे . . ।।

-कविकुमार
28/12/2011



-:( एकांत ):-


होतो जसा काल मी
आजही तसाच आहे ।
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


काळोखाची राञ
आज माझ्या कूशित आहे
निरभ्र ते आकाश
आज का उदास आहे ?
पहावयास कोणीच नाही
चंद्र आणि नक्षञ आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


रोजचे ते रातकिडे
आज का निशब्द आहे ?
गजबजलेल्या पाऊलवाटा
आज ऊगाच स्तब्द आहे
सोबतीला आज माझ्या
फक्त हा एकांत आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


निजल्या दिशा, निजले तारे
निजला हा असमंत आहे
आज माझी निद्राराणी
का मजवरी रुष्ट आहे ?
एकलाच शोधतो मी
हरवले माझे अस्तित्व आहे
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


होतो जसा काल मी
आजही तसाच आहे ।
कालही एकटाच होतो,
मी आजही एकटाच आहे ।।


..................-कविकुमार
                   (25/11/2011)


-:( आरोप ):-


दगड ठेवून हृदयावर मी एक नीर्णय घेत आहे ।

सोडून तुम्हा सर्वाँना कायमचा आज जात आहे ।



नसत्या आरोपांची काहि बोटे उठली माझ्याकडे ।
पाहनार नाही पुन्हा मागे  वळुन कधीच तुमच्याकडे ।



निर्णय माझा अटळ आहे वाईट मला समजू नका ।
पुन्हा कुणाच मन नाजुक मौजेसाठी तोडू नका ।



आठव तूमचा रोज येईल पण मी माञ येणार नाही ।
तूमच्या नी माझ्यातल अंतर आता कधीच दुर होनार नाही ।



साथ होती तूमची माझी फक्त काही क्षणांसाठी ।
आस होती मनापासून निर्मळ अशा मैञीसाठी ।



कधी चुकून कुणाला वेड-वाकड बोललो असेल ।
दोश काही नसुन त्यात फक्त आपलेपणा असेल ।



आलेलो मी इथे फक्त आपुलकीच एक नातं जोडायला ।
पण शक्य असेल तर माफ करा तुमच्या 
 लाडक्या "कविकुमार"ला . . . . .।।।।।



................................-कविकुमार
                                   (17 ऑगस्ट 2011 )