Friday 27 January 2012

|| निशब्द भावना ||








  ||  निशब्द भावना  ||

निशब्द भावना हि अर्थास जन्म देते |
प्रीतीच्या चाहुलीने मन ओसंडून येते | 

भेटीच्या ओढीमध्ये क्षण हळुवार सरू लागतात | 
काळजाचे ठोके अपोआपच वाढू लागतात |

आतुरतेने वाट पाहून तो क्षण सत्त्यात उतरतो |
हलकाच हाथ तुझा माझ्या हातामध्ये  येतो  |

स्पर्श तुझा मानस माझ्या गुदगुल्या करून जातो |
डोळ्यांमध्ये जसा मी तुझ्या नकळत हरून जातो |

वर्णनात तुझ्या काही मन माझे पूटपुटते |
कल्पना माझी जशी एका च्याचित्रामध्ये उतरते | 

माऊ गुलाबी ओठ तुझे  जसे मधुरसाचे प्याले |
मंजुळ तुझ्या आवाजने  माझे देहभान हरपुनी नेले |

निशब्द भावनेला जसे पंख फुटून गेले |
सरता ते क्षण शरीरावर रोमांच सोडूनी गेले........!!!!!! 

.......................................................कविकुमार    

No comments:

Post a Comment