Friday 27 January 2012

-:( परतीचे वेध ):-


परतीचे वेध लागले विसरु नकोस आई
कितीही दुर गेलो तरी चित्त तुझ्याच ठाई

मी घरातून नीघताना डोळ्यात आश्रु तुझ्या थाटतात
डोळे माझे कोरडे परी सागर हृदयात दाटतात

मीञ माझे विचारतात तुला काहीच कसं वाटत नाही ?
कसं सांगु आई तुला मारलेली मिठी सोडवत नाही

हृदयावरती दगड ठेवून मी पाऊल बाहेर टाकतो
खरच सांगु आई गाडीत एकटाच खुप रडतो

निघतो आता आई म्हणताच छोटी बहीन हंबरडा फोडते
करीयरचा माझ्या विचार करुन लगेच हाथ हलवते

निघालोय मी एथुन आता तुझेच संस्कार दाखवायला
भविष्यावर मात करून स्वप्नांचे पान रंगवायला

..........................................कविकुमार


No comments:

Post a Comment