Friday 27 January 2012

-:( हा विरह आता सोसवेना ):-


तडकले आज हृदय माझे, 
आभास स्पंदनांचा जाणवेना ।
परतूनी मजसाठी ये गं प्रिये, 
हा विरह आता सोसवेना ।

जान्हवे त्या ईश्वराचे 
रुप तुझ्यात मी पाहिले ।
जसे बंदिस्त हृदयात तुझ्या 
श्वास माझे कोंडले ।

ऐकांतातही रडताना आता 
पुरावे मागे सुटतात गं ।
बेवफा माझे डोळे आता 
रक्तबिंदु ढाळतात गं ।

स्वप्नांत एकदा नकळत येवून 
ही अवस्ता जीवघेणी पाहूनी जा ।
शिल्लक आहे प्राण थोडा 
हवातर तोही घेवून जा ।

तडकले आज हृदय माझे 
आभास स्पंदनांचा जाणवेना ।
परतुनी माझ्साठी ये ग प्रिये
 हा विरह आता सोसवेना  

.........कविकुमार
          (22 सप्टेंबर 2011)






No comments:

Post a Comment