Saturday 28 January 2012

-: मरणाने केली सुटका :-


सरनावर जाताना फक्त इतकच मला कळल होत ।
मरणाने केली सुटका माझी तर जगण्याने मला छळल होत ।।

जन्माला आलो तेव्हापासून अनेक नाती जोडली गेली,
काही तळहातावरचे फोड, काही जखमेप्रमाणे जपली गेली ।
जीवनाच्या ह्या नागमोडी प्रवाहात माझ्या नकळत वाहून गेली,
साठवताना मनात नात्यांना कळलच नाही हरवून गेली ।
काही जवळचे सोडले तर प्रत्येकाने मला रडवल होत
मरणाने केली सुटका तर जगण्याने मला छळल होत ।। 

शाळेचे पहिले दिवस मला आजुनही स्पष्ट आठवतात,
कॉलेजचे ते क्षण, नकळत हसवतात ।
कळलच नाही तेव्हा कधी एकिच्या मी प्रेमात पडलो,
दुस~यावरोबर तीला पाहताना एकांतात जावून रडलो ।
आंधळा विश्वास ठेवना~याला त्याच्याच मनाने फसवल होत,
मरणाने केली सुटका तर जगण्याने मला छळल होत ।।

आयुष्य माझ सार जस चार दिवसांतच सरुन गेल,
आता जगुया आपल्यासाठी म्हणत अर्ध जीवन संपून गेल ।
डोळ्यात सजवलेल भविष्याच स्वप्न आश्रुंच्या प्रवाहात वाहून गेल,
मला जगायच, जगायच म्हणताना माझ जगायचच राहून गेल ।
अस माझ भावविष्व माझ्याच मुळावर उठल होत,
मरणाने केली सुटका तर जगण्याने मला छळल होत ।।

काहि दिवस सरले आई बाबांच्या सेवे मद्ध्ये,
मग जगु लागलो मी बायकोच्या आपेक्षांच्या गर्दिमद्ध्ये ।
मुले म्हणतील ते मी प्रेमाने आनून द्यायचो त्यांच्या हातामद्ध्ये,
पण शेवटी फक्त एकांत आला स्पष्ट माझ्या वाटणी मद्ध्ये ।
अस हे आयुष्य माझ दूस~यांना बहाल केल होत,
मरणाने केली सुटका तर जगण्याने मला छळल होत ।।

निष्ठूर या दुनियेत खुप जाती-पातीँचा घोळ होता,
दर्शनही पहिल त्याचच होई ज्याच्या जवळ पास होता ।
दुदैव म्हणुन जगात ह्या सा~या भ्रष्टाचार माजला होता,
तसा टेबलाखालून सर्वाँना चहापाणी आवडत होता ।
माणसानेच इथे राहून माणसातल माणुसपण नष्ट केल होत,
मरणाने केली सुटका तर जगण्याने मला छळल होत . . . . !!!


...................................-कविकुमार





No comments:

Post a Comment