Friday 27 January 2012

-:( घरापासून दूर ):-







घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे |
तुझ्या मायेचा छायेत बिनधास्त होतो, 
आता राख्राखत उन आहे ||

प्रत्येकजन इथे फक्त स्वतःपुरता  विचार करतो |
दुसऱ्याचा मनाचा विचार न करता  बेधडक टीका करतो |
दूर जाऊन कळले मला हे जग खूप स्वार्थी आहे |
घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||.



स्वप्नांच्या ह्या नगरीत सगळे लाखोनमध्ये एकटे असतात |
स्वतःला पुढे जायचे म्हणून दुसऱ्याला मागे खेचत असतात |
मी मात्र प्रतेकाला मदतीचा आधार  देत आहे |
घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||



ठरवलेले नियम कोणी मनापासून पाळत नाही | 
शिकण्यासाठी donetion चे रेट कधीच ढळत नाही | 
भ्रष्टाचाराची  कीड आज चांगुलपणाला पोखरत आहे |
घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||



खरच वाटत आता तरी मनुष्याने सुधरायला हव |
स्वतः साठी थोड, थोड दुसऱ्यांसाठी जगायला हव |
निस्वार्थी असा संस्कारांची या जगाला खूप गरज आहे | 
घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||



स्वतःपुरता विचार करण्याचा तसा प्रतेकाला अधिकार आहे |
पण दुसऱ्याला मारून जगन, हा कुठल्या जगाचा न्याय आहे?
स्वतःपुरत जगुनही दुसऱ्यांना जीवन शिकवायचं आहे  |
घरापासून दूर आई जग खूप वेगळ आहे ||
  
..........................................कविकुमार



No comments:

Post a Comment