Friday 27 January 2012

-: असे मित्र बनवा :-




असे मित्र बनवा जे कधीच साथ सोडणार नाही |
असे प्रेम करा ज्यात स्वार्थ असणार नाही |

असे हृद्य बनवा कि ज्याला तडा जाणार नाही |
असे हास्य बनवा ज्यात रहस्य असणार  नाही |

असा स्पर्श करा ज्याने जखम होणार नाही |
असे नाते बनवा ज्याला कधीच मरण नाही |

असे समंध बनवा ज्यावर बोट उठणार नाही | 
अशा आठवणी साठवा ज्यांनी डोळे पाणावणार नाही |

असे प्रश्न बनवा ज्यांची उत्तरेच सापडणार नाही |
असे शब्द बनवा ज्यांना धार असणार नाही |

असे डोळे बनवा ज्यांत अश्रू येणार नाही |
असे काळीज बनवा जे कधीच वितळणार नाही |

अशी भावना बनवा जिने त्रास होणार नाही |
असे स्वप्न सजवा जे कधीच तुटणार नाही |

असे क्षण बनवा जे कधीच सरणार नाही |
असे दिवस बनवा जे कधीच मावळणार नाही | 

असे आयुष्य बनवा ज्यात दुख असणार नाही |
ज्या जीवनात आनंद शिवाय काहीच असणार नाही | 

.....................................कविकुमार

No comments:

Post a Comment