Thursday 26 January 2012

-:( कुठे गेले ते बालपण ):-

कुठे गेले ते बालपण ?

ते अंगणात धुडूधुडू धावने |
देवघरासाठी फूले गोळा करणे |

शाळेत न जान्यासाठी नको ती नाटके |
आणि गेल्यावर बाईँच्या छडीचा मार खाणे |

शाळेतल्या मित्रांबरोबर खेळायला जाने |
लवकर आलो नही म्हणून आईचे रागावणे | 

बाबांचा खांद्यावरून फेरफटका मारणे |
रस्त्यावरील खेळण्यासाठी नुसता हट्ट धरणे |

रात्रीत रंग भरणाऱ्या त्या आजीचा गोष्टी एकने | 
गोष्टींतल्या शंका न राहून विचारणे |
  
सायंकाळी ताईबरोबर अभ्यासाला बसने |
नाही केला म्हणून तीचे ते ओरडणे |

दमल्यावर आईच्या मांडीवरच झोपणे |
नाही येत म्हणून तीचे ते बोबडे गुनगुनणे |

खरचं कुठे गेले ना ते बालपण ?

...................................कविकुमार 



No comments:

Post a Comment