Friday 27 January 2012

-:( एक विदुषक ):-



आज माझ्या मोबाईल वर अचानक एक फोन आला |
नंबर होता अनोळखी, अन आवाज कातारलेला आला |

बोलला बोलतोय सर्कशीतला एक विदुषक मी |
तुम्ही म्हणता तस रोज लोकांना हसवण्याच काम करतो मी |

ह्याच सर्कशीच्या मागच्या बाकड्यावर माझ्या जन्म्दात्रीने मला सोडल होत |
तिचा शोध घेता घेता एका विदुषकाने मला पोसल होत |

हळू हळू मोठा होताना जीवनाशी मी झगडत होतो |
खेळ पाहणाऱ्या चिमुरड्यांच्या डोळ्यात माझ बालपण शोधत होतो |

जन्माला आल्या आल्या नियतीने हा खेळ रचला |
दिले जिने अस्तित्व मला तिचाच डोळ्यांत माझा जन्म बोचला |

तुम्हीच सांगा मला की तिची माझ्यावर माया नव्हती ?
आई म्हणतात जिला तिचाच दुधाची चव सुधा कळली नव्हती |

अस कोणत आभाळ कोसळलं तीचावर ज्यामुळे मला सोडून गेली |
मातृत्वाचे संस्कार सोडून खोलवर घाव देऊन गेली |

ह्या आयुष्यात मला फक्त तिला एकदा पहायचं आहे |
जिच्या आत्म्यात शोधतो ईश्वर तीचातले दगडाचे मन ओळखायच आहे |

विचार्यचा आहे जाब तिला ह्या इतक्या कठोर शिक्षेसाठी |
कुठल्या जन्मीचे पाप माझे भोगास आले ह्या जन्मासाठी |

फोन बंद करता करता तो असंख्य प्रश्न विचारत होता |
जगाला रोज हसवणारा "एक विदुषक" आज प्रत्यक्ष रडत होता |

 ..................... आज प्रत्यक्ष रडत होता !!


.......................................-कविकुमार







No comments:

Post a Comment