Saturday 28 January 2012

|| आधार || ( मराठी लेख )

              
              आज  दि.  २१- ६- २०११ सकाळचे सर्व विधी उरकून office साठी घराबाहेर  पडलो, बस पकडण्यासाठी मी stop वर आलो रोजच्या सारखाच  stop वर  माझ्याच वयाच्या मुला मुलींचा घोळका खिंदळत  होता, काही पुरुष आणि स्त्रीया घड्याळाच्या काट्यावर लक्ष ठेऊन उभे होते, वायोवृद्ध लोक   stop  वरील  बाकड्यावर बसची  वाट पाहत बसले होते, थोडासा रिमझिम पाऊस येऊन गेला होता.  जवळ जवळ २० मिनिट वाट पाहून  क्र. ३२१ stop च्या दिशेने धावत आली. बस पकडण्यासाठी जमाव सावध झाला. मुंबईच्या बस बद्दल सांगयचं झाल तर स्वतंत्र एक पुस्तक काढव लागेल, असो.....!! ५ सेकंद थाबणारी बस stop  वर येऊन थांबली. हळू हळू  सार्वजन बस मध्ये चढले आणि मी सुद्धा, शेवटला चढणारे काही बस मध्ये गर्दी असल्या कारणाने दरवाजातच लटकले बस सुरु झाली .
                  


              पौसामुळे दरवाजात असणार्या दांड्या थोड्याशा ओलसर झाल्या होत्या, बगता बगता बसने वेग पकडला. बस एका वळणावर असतानाच  चालू बसचा वेग, ओलावलेल्या दांड्या, आणि बसमधली गर्दी ह्यांचाशी झगडत असणार्या लाटकलेल्यानपैकी असलेलेला एक तरून हाथ सटकून बसबाहेर  फेकला  गेला. खिडकीतल्या लोकांनी ते दृश्य अचूक टीपल आणि बस थांबविली चीनाग्रस्त जमावाने बसबाहेर लगबगीने धाव घेतला मी सुद्धा त्यांचातच होतो वयाने २५ ते ३० च्या दरम्यान असणारा तो तरुण, त्याचा डोक्याला रक्ताची धार लागली होती जवळ जवळ हाताची ४ बोट सहज आत जातील इतकी खोलवर जखम त्याला झाली होती ती पाहण्या साठी मात्र तो तरून शुद्धीत नव्हता. drivar आणि condaktar ला santapt जमावाने जाब विचारयला सुरुवात केली पण त्यांची ह्यात काय चूक ? बसला लटकने हे मुळी  कायद्यातच बसत नाही. पण ह्या  एव्द्याशा चुकीची त्या तरुणाला इतकी मोठी शिक्षा व्हावी ?   त्या विरुद्ध त्या तरुणाला दवाखान्यात फोचवल असत तर ? पण जमावाने भांदनार्याची भूमिका  घेतली त्या तरुणाकडे कुणाच नंतर लक्ष सुद्धा नव्हत.
              

               जमवला त्याचा दिशेने वळण्याचा इशारा करून मी त्याला उचलण्याचा निरागस प्रयत्न करू लागलो त्यातल्या काहींच लक्ष माझ्याकडे गेल म्हणून ते सुद्धा त्याला उचलण्यात मला मदत करण्या साठी पुढे सरकले तितक्यात जमावातल्या एकाने मला मदत करत असणार्यांना उदेशून काही उदगार बाहेर काढले "हि पोलीस  केस होऊ शकते , कशाला भानगडीत पडताय राव ? " मदती साठी पुढे आलेले हाथ काहीशे आकडते झाले एकट्याला वजन झेपल नाही म्हणून मी हि त्या तरुणासकट खाली  कोसळलो पण ह्या अनोल्खींचा जगात वावरणाऱ्या माणुसकीचा अंधळ्या लोकांना  थांबवण्यसाठी  काही माझा  आवाज बाहेर फुटला नही, क्षणभर कीव आली त्या लोकांची कि ह्या तरुणाचा जागी उद्या त्यांचा मुलगा असता तर ? त्यांनी अशीच मान फिरवली असती का ? हा पण कुणाचा tri मुलगा आहेच  ना ?
           

              माझ पांढर्या रांगाच शर्ट जणू लाल गुलालात बुचकळून काढल्या सारख झाल होत तितक्यात रिक्षाला हात दाखवत त्याला दवाखान्यात घेऊन जाण्या साठीचा निर्णय घेतला दोन तीन रिक्षा वाले थाब्ले देखील पण रक्ताळलेला शर्ट आणि जखमी बेशुद्ध तरुण पाहून पाल काढला त्यांनी सुद्धा , काही अनोळखी  पण चांगल्या लोकांची नझर अम्चाकडे गेली म्हणून ते धावतच आमचापाशी  आले रिक्षा थांबून दिली आणि दावाखाण्यापर्यंत आम्हाला फोचवल त्या तरुणाच्या खिशातील फोन  काढून डॉक्टरांनी कुणालातरी फोन लावला  आणि घाटीत प्रसंग सांगितला थोड्याच वेळात त्याचा ताबा घरचा व्यक्तींनी घेतला
             

             आभार पदरात पडून घ्यायचे नव्हते म्हणून मी तिथून सर्वांचा नकळत  सटकलो माझ्या बरोबर दवाखान्य पर्यंत आलेले लोक अजून तिथेच होते बाहेर येताच असंख्य  प्रश्नांनी मनात गोंधळ  घालयला सुरुवात केली दगडाला शेंदूर फासून त्याचा पुढे डोक आपटणार्याना माणसातल्या खर्या देवाची ओळख कोण करून देणार ? गरजवंताला मदतीचा हाथ पुढे कारवे हे संस्कार  कोणती शाळा देणार ? माणुसकी हा एकच धर्म आहे त्या साठी कोणता राजकारणी झगडणार ?

           
             मित्रानो खरचं ! थोडा विचार करा नकळत आपणही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून माणुसकीचा गळा तर घोटत नाही ना ? हा लेख प्रकाशित करण्या माघे कारण एकच ह्या लेखाचा नायक होण्या पेक्षा आपल्या                
प्रत्येकात असणारा माणुसकीचा महानायक जागा करयला मला जास्त आनंद होईल 

बुडत्याला  काठीचा आधार द्या , गरजवंताला मदतीचा हात द्या  

धन्यवाद  !!!

तुमचा लाडका
कविकुमार   

No comments:

Post a Comment