Friday 27 January 2012

-:( प्रिये तुझा आठव ):-





प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला ।
जसा तुटता तारा माझी स्वप्न चोरूनी गेला ।।

श्वास माझे गंभीर आणि आधिक जड होतात ।
काळजाचे ठोके आपोआप बंद होतात ।
हा खेळ आभासांचा मला नकळत सतवुन गेला ।
प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला ।।

हरवले माझे क्षण, पाऊस उरात दाटला ।
बरसताना डोळ्यांतून हरएक थेंब गोठला ।
कळालच नाहि कधी, दडवलेला आश्रु वाहून गेला ।
प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला ।।

तेव्हा उमजली नाही मला का होती ती टाळाटाळ ।
तरी मनापासुन तूला जीव लावला जीवापाड ।
का माझा अटळ विश्वास, विश्वासघात करूनी गेला ।
प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला ।।

सुखात तूला पाहण्यासाठी स्वत: दुखी झालो ।
हजारदा दुखवलेस मला ते ही विसरूनी गेलो ।
निस्वार्थि माझ्या प्रेमाचा आज श्वास कोंडुनी गेला ।
प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला ।।

भांडतोय आज विधात्याशी हे अस आयुष्य का दिलस ।
सर्वाँना वगळून हळव हृदय फक्त मलाच का दिलस ।
एकांत सुद्दा आज माला निर्वाद छळून गेला ।
प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला ।।

भावनांच्या स्पर्धेत ह्या आज तू मला हरवलेस गं ।
कापसाच आहे हृदय माझ, दगडाच तू बनवलस गं ।
अट्टहास माझा आज, पत्थरात जीव ओतूनी गेला ।
जसा प्रिये तुझा आठव आज मनास स्पर्शुनी गेला . . . ।।


................................................-कविकुमार
                                                 (15 सप्टेँबर 2011)

No comments:

Post a Comment