Friday 27 January 2012

-:( दुर्भाग्य ):-





दुर्भाग्य आमच की मराठीहून लवकर आम्हाला इंग्रजी कळत आहे ।
परकिय भाषा आज भारतावर राज्य करत आहे ।

दुरवर कुठेतरी माझी मातृभूमी रडत होती ।
पोसल आजवर ज्या सूपुञांना त्यांनीच साथ सोडली होती ।

भ्रष्टाचाराच्या सागरात सारा देश जळत होता ।
आम्हा सर्व सामान्यांना मनमुराद छळत होता ।

पण आता वेळ आली आहे एकजुटीने लढण्याची ।
मोडून जावू पण वाकनार नाय हे सरकारला दाखवन्याची ।

त्या रक्ताच्या प्रत्येक थेँबाचा आज आदर्श ठेवुया ।
ज्यांनी दिले बलिदान त्यांचा वसा आपण चालवुया ।

सजवले होते त्या स्वातंञ्याचे स्वप्न आपण साकार करूया ।
करपशनच्या जाळ्यातून आज भारतमातेला सोडवुया ।

देशात माजलेल्या भसमासुराला आज यमसदनी धाडायच आहे ।
आण्णा आप आगे बढो, पुर्ण देश आपल्या बरोबर आहे ।


................................।। जय हिँद  ।।

.................................-कविकुमार
                             18 ऑगस्ट 2011 

No comments:

Post a Comment