Friday 27 January 2012

|| जाब ||


                       
मनात भरून राहिलेल्या गोष्टीना आज सांगायचं ठरवल !
काहीही झाल तरी आज देवाशी भांडायचं ठरवल..... !

सावलीने  माझ्याच माझी साथ सोडायचं ठरवल |
ठरवून मग मी त्या देवाला जाब विचारयच ठरवल |

तडजोड केली नाही जीवनाशी हे असे दिवस आले |
आयुष्यभर  स्वागतास पेटते निखारेच आले |

एक हळव हृद्य तू मलाच का दिलस ?
त्यात होणाऱ्या हालचालींस फक्त मी शब्दच रूप दिल | 

आठवतये का कुठेतरी दगड म्हणून पडला होतास  | 
भाउक  अंतकरणाने तुला आम्ही देवपण दिल |

का बनवलीस वाट ह्या जीवनाची इतक्या कठिण रस्त्याची |
जशी एखादी असह्य वेदना पायात  रुतलेल्या काट्याची | 

त्यात भर घातलीस कचकड्यांचा  नात्यांची |
जशी एखादी नाजूक गाठ रेशमाचा धाग्याची |

...................................कविकुमार
                 

No comments:

Post a Comment