Friday 27 January 2012

-:( कल्पनेस माझ्या ):-




कल्पनेस आज माझ्या असे पंख का फुटावे
कि पापन्यांच्या किनारी बांध आज फुटावे

शब्दास आज माझ्या मोजून भाव द्यावे
हृदयाच्या काठावरती नूसतेच घाव व्हावे
मनास आज माझ्या असे पाय का फुटावे
कि पापन्यांच्या किनारी बांध आज फुटावे

नजरेचे बाण माझे क्षितीजास का भीडावे
भावनांचे काटे काळजास का रूतावे
आठवनीँचे मेघ आज असे का रूसावे
कि पापन्यांच्या किनारी बांध आज फुटावे

स्वप्नात आज माझ्या तेच प्रतीबिँब दिसावे
उगवलेल्या दिवसाने हळूच आश्रु पूसावे
हातात फक्त माझ्या असे क्षण का उरावे
कि पापन्यांच्या किनारी बांध आज फुटावे

आभाळाने बोलवावे
ओढ रक्ताला लागावी
हृदयाच्या पनतीत प्राणज्योत फडफडावी
येता जवळ घटिता असे वादळ उठावे
कि पापन्यांच्या किनारी बांध कायमचे फुटावे

..............................................कविकुमार




No comments:

Post a Comment