Friday 9 November 2012

-:[ उगाच मन सुखावते ]:-


तुझ माझ्याशी नात 
अस कस हे आहे ? 
कोण आहे तुझा मी 
माझी कोण तु आहे ? 


छीटकारतो तुला मी 
वेदना मलाच होते 
पाहतोच सुख तुझे 
पन दु:ख मलाच होते 


दुरव्यातही तुझीच आस 
एकांतही तुझाच भास 
लागलेली ठेच मला अण् 
फुंकर म्हणुन तुझाच श्वास 


जवळीक देइल वेगळेच वळन 
मला याचीच भिती वाटते गं 
दुरच सही, पन सुखी राहू 
आता असेच मला वाटते गं 


जाता जाता फक्त आता 
इतकेच मला सांगशील का ? 
या नात्याला मैञी म्हणुन 
नाव पुरेस नव्हतच का ? 


हार माझी मान्य परी 
तु माञ जीँकलीच नाहीस 
किमान माझी मैञी तरी 
तुतर समजु शकलीच नाहीस 


वचन माझे तुटनार नाही 
याद तरी तुलाच पुकारते 
जीँकुनही हार मानन्यास 
आज उगाच मन सुखावते 


आज उगाच मन सुखवते . . . । 


-कविकुमार 
[१२।८।२०१२ , १०:४०PM ]


No comments:

Post a Comment