Friday 9 November 2012

-:( परोपकार ):-







इतरांना सुगंध देन्याकरता 
का फांदीपासुन तुटाव लागत ? 
इतरांना प्रकाश देन्याकरता 
का वातीला जळाव लागत ? 

काळोखाची राञ एकटी 
का चँद्राला जागाव लागत ? 
इच्छा माझी पुर्ण कराया 
त्या ताऱ्‍याला तूटाव लागत 

याद कुणाची येता मजला 
का आश्रुंना ओघळाव लागत ? 
तहान माझी होन्यासाठी 
रोज नदीला वहाव लागत 

राञीमागुन दिवस उगवला 
का सुर्याला तळपाव लागत ? 
श्वास माझा होन्यासाठी 
उगा हवेला पळाव लागत 

जीवनाची जिंकन्या लढाई 
क्षणा क्षणाला लढाया लागत 
निसर्ग वेडा मला सांगतो 
परोपकाराने जगाव लागत 

-कविकुमार 
(२४।६।२०१२, 1:18AM)

No comments:

Post a Comment