Friday 9 November 2012

-:( पूर ):-


गजल 


यादेस आज तुझीया भलताच नूर आला 
मीटता चुकून डोळे स्वप्नास पूर आला 


तालास साथ देण्या कंठात प्राण नाही 
कामास आज माझ्या परकाच सूर आला 


छायेस शोधताना चटके उन्हात बसले 
सुर्यासही पहा त्या ग्रहनात ऊर आला 


देतास घाव मजला केला प्रयास त्यांनी 
भोगावया गुन्ह्याला भलता चतूर आला 


बघ सोनिया कुणाची प्रश्ने 'कुमार' पुसतो 
या जिँदगीत माझ्या सल्ला फितूर आला 


-कविकुमार 
(२२।७।२०१२ , १२:३३ AM)



No comments:

Post a Comment