Sunday 1 April 2012

!! शिक्षण एक प्रार्थमिक गरज !! (लेख)



        आज ३१ मार्च २०१२ नुकतीच परीक्षा संपली , दरवेळी प्रमाणे गावी आल्यावर गावाच्या जवळच असलेल्या अष्टविनायकापैकी एक विघ्नहर्त्याला , ओझरला जान मी टाळत नाही त्याचप्रमाणे ह्यावेळी परीक्षेनंतर ओझरसाठी  जाण्याचा निश्चय केला , दोन नेहमीचे  मित्र हाताशी धरले आणि थेट ओझर गाठलं .

          त्या विघ्नहर्त्याच्या दर्शनाने मन तृप्त झाल, बाहेर पडताच मी बूट घालत होतो , नेहमीच्या हॉटेल मध्ये ये अस सांगून मित्र निघून गेले प्रसाद खरेदी करून मी हॉटेलच्या दिशेला वळालो तितक्यात एक वयाने ९ ते १० च्या दरम्यानची छोटीशी मुलगी समोर आली आणि गंध लाऊन घ्या असा हट्ट तिने धरला "दादा गंध लाऊन घ्या ना, चहा साठी अजून दोन रुपये पण नाही जमलेत हो सकाळपसून "  मंदिरातून जाऊन आल्यानंतर गंध लावणे जरा विचित्रच वाटल.

             तिला म्हणालो चल तुला चहा साठीच दोन रुपये हवेत ना त्यापेक्षा चहाच देतो हवंतर नाश्ता सुधा कर, चालेल ?  अस म्हणून तिला हॉटेल च्या जवळ घेऊन आलो पायर्या चढत असताना तिने अचानक माझा हात मागे खेचला अन म्हणाली , दादा नाश्ता नको मला , मदतच करत असाल तर समोरच्या दुकानातून एक पाटी आणि पेन्सिल घेऊन ध्या मला उपाशी राह्यची तर सवय झालीये आता काहीच वाटत नाही घरी फक्त एक मोठी बहिण असते ती सुद्धा धून-भांडी  करून करतो आम्ही  गुजराण. घरी खयचे हाल म्हणून शिक्षण घेण शक्य नाही , इच्छा तर खूप आहे कि इतरांसारखं मी सुद्धा शाळेचा गणवेश चढवावा अन शाळेत जाव पण ते शक्य नाही , बोलता-बोलता तिच्या गोजिरवाण्या डोळ्यांत शिक्षणाची भूक साफ गालावर उतरली होती , माझ्याही मनाला पाझर फुटला तिला हॉटेल मध्ये घेऊन आलो  नाश्ता केला चहा झाला आणि  घटीत प्रसंग मित्रांनाहि सांगितला .

         बाहेर येताच पाटी पेन्सिल , वही पेन , आणि एक बाराखडीच पुस्तक तिला घेऊन दिल. निरोप देताना त्या इवल्याशा जीवाच्या चिंतेने मन अगदी पोखरून काढल . गाडीपर्यंत ती आम्हाला सोडवायला आली जाता-जाता  भरीव अंतकरणाने तिला एव्हडच सांगू शकलो कि हे दोघे प्रत्येक कातुर्थीला देवळात येतात शिकण्यासाठी लागणारी कोणतीही गोष्ट आमच्याकडे अगदी हक्काने मागत जा , माझ्या मित्रांनीही तिला हेच बजावलं आणि त्या विघ्नहर्त्याच्या भरोश्यावर तिला सोडून आम्ही परतीचा मार्ग पकडला

        गाडीवर असतानाच तिच्याच विचारांनी मन पार ओलचिंब झाल , मित्रहो खरचं  ! जगाच्या पाठीवर असे  असंख्य जीव राहतात ज्यांना परीस्तीती आणि नियतीच्या खेळापुढे शिक्षणासारख्या प्रार्थमिक गरजेची भूक  भागवन शक्य होत नाही . सर्वच नाही पण किमान एका भुकेल्याच्या तृप्तीचा ढेकर होण्याच सौभाग्य प्रत्येकाच्या पदरी पडाव, आणि सुशिक्षित उज्ज्वल भविष्याच्या दिशेने देशाच्या प्रगतीने झेप घ्यावी ह्यासाठी नेहमी कार्यरत राहुयात

जय हिंद !!

तुमचा लाडका
 कविकुमार


 

No comments:

Post a Comment