Friday, 10 August 2012

-:( अट्टहास ):-

गजल

दडवला उशाशी तुझा ध्यास होता
तुझे प्रेम होते की आभास होता ?

कशालास तु सोडीलेस हाथ माझे ?
अरे ठेवीलेला तो विश्वास होता

तुझ्या आठवांचा ना सुकला झरा
कसा कोँडलेला तुझा श्वास होता ?

मनालाच मी तर किती सावरावे ?
अनावर कसा हाच हव्यास होता ?

अरे सोनियाच्या 'कुमारास' सांगा
तीला मीवन्यासाठीच हा ध्यास होता


-कविकुमार
(७।७।२०१२ , १०:३२PM)


Tuesday, 12 June 2012

-: चक्रव्युह विचारांचे :-




झाला सुळसुळाट येथे 
अस्तित्व मुळाचे संपले 
काँपी पेस्ट करुनिच 
नाव स्व:ताचे टाकले 

कवी लाचारा सारखे 
शोध घेतो चोरट्याचा 
कोणी चोरले हृदय 
कोणी काळीज फाडले 

कवितेला पंख आले 
तीच उडुनीया गेली 
जन्मदात्याचे ते ऋण 
तीच विसरुनी गेली 

मोठी वेदना मनाची 
पाणी डोळ्यांतुनी वाहे 
मुका समाज भोवती 
खेळ भावनेचा पाहे 

नको आता ही जखम 
नको सुगावा सुखाचा 
एक थीनगीच हवी 
शोध घ्याया सत्यतेचा 

चक्रव्युह वीचारांचे 
झाली शब्दांची लडाई 
घावे एक अभीमन्यु 
जीव गमावीला ठाई 

-कविकुमार 
(११।६।२०१२ / ३:१५ AM)

Saturday, 9 June 2012

-:( र्‍हास ):-




गजल 

आयुष्य मांडताना भलताच त्रास झाला 
हृदयात ठेवलेला निशिगंध फास झाला 

या वादळात सारे माझे तुटून गेले 
संचित आठवांचा पाऊस खास झाला 

विरहास या तुझ्या मी दुःखास भोगताना 
आलीच वीज जैसी साराच र्‍हास झाला 

कल्लोळ माजलेला या काळजात माझ्या 
दुर्दम्य वेदनेने समृद्ध स्वास झाला 

ये रे 'कुमार' आता या सोनियाचसाठी 
अदृश्य भासणारा तो आसपास झाला 

-कविकुमार 
(३१ में २०१२)

-: थोडाच राहिलो :-


गजल 

नवखाच राहिलो मी 
परखाच राहिलो मी 

जपले कितीक नाते 
न्याराच राहिलो मी

तू वाच रोज गजला 
मतलाच राहिलो मी

होते कुणी न येथे 
माझाच राहिलो मी 

ना सूर्य चंद्र आहे 
ताराच राहिलो मी

जाळून जिंदगीला 
थोडाच राहिलो मी

माझ्याच सोनियाच्या 
ह्रदयात राहिलो मी

आहे कुमार त्याचा 
त्याचाच राहिलो मी

-कविकुमार 
(३०-५-२०१२)


Wednesday, 16 May 2012

‎-: रोमांच :-

‎गजल

पुन्हा सांज झाली पहा मित्र हो
कशी ती न आली पहा मित्र हो

सभोती तिच्या आठवांचा झरा
तिच्या मी हवाली पहा मित्र हो

तिला काय सांगू मला ना कळे
विचारे खुशाली पहा मित्र हो

अशी रात्र असते ग स्वप्नातली
पहाटे उगवली पहा मित्र हो

अरे सोनिया हाक मारू किती
अचानक बिलगली पहा मित्र हो

कुमारास ती भेटली सोनिया
कुठेही न अडली पहा मित्र हो

-कविकुमार
(22-5-2012)
 


Monday, 14 May 2012

-: रात्र गेली :-



गजल 

निष्पाप चांदण्यांना लपवून राञ गेली 
होती नशा सुखाची फसवून राञ गेली 

ते वायदे फुलांचे स्वप्नात तू दिलेले 
ते पोपटी उखाणे फितवून राञ गेली 

हा चंद्र चांदण्या पण काळोख सोबतीला 
या धूंद पापण्यांना मिटवून राञ गेली 

बैचेन आप्त सारे या स्तब्ध पावलांचे 
निस्वार्थता दिसेना हुडकून राञ गेली 

त्याचे टपोर डोळे टिपतात आसवांना 
स्पर्शाविनाच येथे उमलून राञ गेली 

त्याचे 'कुमार' डोळे दिसतेच सोनियाचे 
या आठवात सारी बिलगून राञ गेली 

- कविकुमार 
(१२।११।१२)

Saturday, 28 April 2012

-: तुझ्याविना :-





मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविना
 

मी असाच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविना 

रोज-रोज आठवात सांजवेळ साजणी 
तूच सांग ना मलाच कर गुन्हा तुझ्याविना 

का अशीच छेडते तुलाच सांगतो सदा 
मी कसे जगायचेच सांग ना तुझ्याविना 

मी हयात आजही तुलाच का दिसे न मी 
मरण सोसले किती क्षणाक्षणा तुझ्याविना 

आठवात एक एक दिवस वर्ष वाटते 
सोनिया 'कुमारची' जगेचना तुझ्याविना

-कविकुमार
(२७-०४-२०१२ )