Friday, 30 March 2012

!! रंगमंच !!



आयुष्य हा एक रंगमंच आहे

ह्या रंगमंचावर मानसाला

अनेक भुमीका निभवाव्या लागतात
रंगमंचावर उभा असताना त्याला
एकाचवेळी सर्वांच लक्ष वेधाव लागत

ज्या आयुष्यासाठी इतका झटतो

ते तर एक-एक दिवस कमी होतच जातं

आईच्या गर्भातले नऊ महिने

नऊ दिवस सोडले तर
नंतर सुरु होते ती आयुष्याची वजाबाकी

म्हणुन वर्तमानात जगायला शीका

कालच्या आठवनी आणि उद्याची चिंता
या गोष्टिँमुळे आजला वाया घालवू नका

आयुष्य खुप सुंदर आहे

त्याला आनखी सुंदर बनवा

कविकुमार

-:( इशारे ):-

असे क्षणा क्षणाला बदलतेस का इरादे ?
चोरुन नजरेने करतेस का इशारे ?

पाहून शरम येते अण् प्रश्न उरात दाटे
पाहून खेळ नजरेचे उठतात का शहारे ?
चोरुन नजरेने करतेस का इशारे ?

नजरेत जादूगीरी पण अदा कातील वाटे
येण्यास जवळ माझ्या शोधतेस का बहाने ?
चोरुन नजरेने करतेस का इशारे ?

चालीत नशा आहे बोलीत शर्करा काटे
आठवांनी तुझ्या सुचतात का तराने ?
चोरुन नजरेने करतेस का इशारे ?

असे क्षणा क्षणाला बदलतेस का इरादे ?
चोरुन नजरेने करतेस का इशारे ?

-कविकुमार
(६/२/२०१२)

 

Tuesday, 31 January 2012

!! रहस्य !!


गजल 

सुचते मनास माझ्या बोलून टाकतो मी ! 
हे दु:ख अंतरीचे मांडून टाकतो मी ! 

जेव्हा तरंग उठते त्या-त्याच भावनांचे 
आतूर लेखणीला उतरून टाकतो मी ! 

मोकाट कल्पनांचे सुटतात सर्प तेव्हा 
हे डंक साहवेना मारून टाकतो मी ! 

एकांततेच त्याचे आभार मानताना 
ज्याला नको महत्व देऊन टाकतो मी ! 

आहे 'कुमार' गजला सांगू नको कुणाला 
माझे रहस्य आता दाबून टाकतो मी ! 

-कविकुमार

Sunday, 29 January 2012

-:( जीवघेनी थट्टा ):-


तुझ्या आठवनींना समजव जरा 
त्या नेहमी माझा पाटलाग करतात 
मैफिलीत जरी बसलो मी 
तरी त्या मला एकट करतात ।। 

सहवास तूझा नकोच मला 
फक्त थोडा अवकाश दे 
काळोखात हिँडतो मी 
फक्त थोडा प्रकाश दे ।। 

प्रेमाच्या या लढाईत 
मी पुर्णपणे हरवलो गं 
प्रयत्नांत विसरन्याच्या तुला 
मी एकांताशी भांडलो गं ।। 

फक्त एकच मागन आहे आता 
तेव्हड माञ नाकारु नकोस 
पुन्हा अशि जीवघेनी थट्टा 
दुस~या कुणाची करु नकोस ।। 

अपेक्षा करशील तू प्रेमाची 
पण प्रत्येकजन वफादार नसतो 
फुलाप्रमाने तूला जपायला 
प्रत्येकात कविकुमार नसतो ।। 

.......-कविकुमार 
(१९ जानेवारी २०१२ )


!! शोध !!




रखरखत्या या जीवनाच्या ऊन्हात 
थंड मायेचा पाझर शोधतो 

चटके सोसत असताना 
कुठेतरी प्रेमाची शितलता शोधतो 

तहानलेल्या व्याकूळ माझ्या डोळ्यांत 
सुखसागराचा गारवा 
शोधतो
 
आठवनीँच्या वेगवेगळ्या ऋतूंमधुन 
जून्या नात्यांची गरमी  
शोधतो 
.

हिवाळ्याच्या या कडाक्याच्या थंडीत 
मैत्रीची ऊब शोधतो 

काळाच्या ओघात पडून गेलेल्या पावसात 
क्षणांचे दवबिँदु शोधतो 

डोळ्यात येणा~या भरती ओहोटित 
गहिवरलेले मोती शोधतो 

दूस~यांच्या चेहऱ्यावर आनंदाची फुले उमलवताना 
माझ्यातला मी आता मलाच शोधतो 

हृदयाच्या पडद्याआड डोकावून पाहताना 
माझ्यात दडलेला "कविकुमार" शोधतो 

..............कविकुमार

-:( एक कहानी लग्नाची ):-


भावबंध रेशमाचे 
त्याला जोड सोन्याची 
तुझ्या होकाराने लीहू शकेल 
मी नवि कहानी प्रेमाची 

सप्तर्षिच्या साक्षिने 
पकडू वेळ मुहूर्ताची 
आई बाबांच्या मंजुरीने 
छापु पञीका आमंञनाची 

गनरायाच्या पुजनाने सजवू 
स्वप्ने आपल्या लग्नाची 
न विसरता धाडू प्रत्येकाला 
विनंती त्या सोहळ्याची 

आतुरतेने वाट पाहून 
ती शुभघडी येईल जीवनाची 
फक्त दोघांच्या मध्ये असेल 
तेव्हा भिँत आंतरपाटाची 

मंगलाष्टकांच्या सुरांत बांधुया 
गाठ आर्ध्या आयुष्याची 
अग्निदेवतेच्या साक्षिने घेवूया 
शपथ सात जन्माची 

आदर्नियांच्या आशिर्वादाने 
धरू वाट सुखी संसाराची 
नक्षञांनी सजवूया 
एक गाडी प्रवासाची 

पुष्पकमलांनी पुर्ण असेल 
तयारी आपुल्या स्वागताची 
ओलांडून मापास सांडुदे 
रास त्या अक्षतांची 

पावलांनी लक्ष्मीच्या वाढेल 
शोभा माझ्या सदनाची 
श्वासात मीसळूनी श्वास 
रंगवूया ती राञ मधुचँद्राची 

-कविकुमार 
( १५ डिसेंबर २०११ )


-: नंतर केव्हातरी जगेल :-





बरेच प्रश्न पडतात पण
उत्तरे काही सापडेना !
आयुष्य एक कोड आहे पण
ते काही केल्या उमजेना !!

आई म्हणते जगन्याचा 
दृष्टिकोन बदलायला हवा !
बाबा म्हणतात आपला रस्ता 
आपनच शोधायला हवा !!


आई म्हणते सर्वाँशी 
प्रेमाने तू वागत जा !
निष्ठुर आहे जग पण 
तू आपुलकिने जगत जा !!


बाबा म्हणतात आता तू 
जीद्दीने लढायला हवं !
आयुष्य एक शर्यत आहे
तूला जिँकायलाच हवं !!


प्रेम आणि जीद्दीची 
ही गं कसली लढाई ?
विचार माझे स्तब्द होतात
हे कुणाला गं सांगु आई ?


विचारचक्रावर या 
मी कसा मिळवू ताबा ?
जिँकेल सा~या जगास 
थोडा विश्वास ठेवा बाबा !!


खरच सांगु आई आज 
खुप भीती वाटतेय गं !
मी फक्त एक थेंब आणि
जीवन आहे सागर गं !!


बाबा तुमच्या स्वप्नांसाठी
मी दिवस-राञ झगडेल !
माझ्या स्वप्नांसाठी माञ 
नंतर केव्हातरी जगेल !!


नंतर केव्हातरी जगेल . . . . .!!

.................-कविकुमार
                  23/12/2011