Thursday, 29 August 2013

-:( गुपित ):-


हसता मला न आले 
रडता मला न आले 

कळले गुपित आता 
जगता मला न आले 

तुटली कधीच नवका 
तरता मला न आले 

जगने जरी न युद्ध 
हरता मला न आले 

असता मनात माझ्या 
सजता मला न आले 

झुकताच मान त्यांची 
लढता मला न आले 

जळला 'कुमार' जेव्हा 
मरता मला न आले 

कविकुमार - 
(२७।४।१३)

-:( प्रारब्धा थीगळ ):-



सावरले पापनीला 
आला पोटाशी ओघळ 
भावनांशी झुंजताना 
लागे प्रारब्धा थीगळ 

ढग दाटले मनात 
शब्द आडले ओठात 
गोठलेल्या लेखनीला 
माझ्या आसवांची भ्रांत 

पाणी आटताना आला 
पहा श्रावनाचा मास 
तृष्णेपाई ओढावला 
मृगजळाचा तो भास 

गंध मातीचा दरवळे 
ऋतु आठवाचे ओले 
लागे मनात हालाया 
जुन्या क्षणांचे ते झुले 

वळताना आज वाती 
गुज मनाचे कथीले 
लावताना शब्दज्योत 
प्रेम दिव्यात ओतीले 

कविकुमार - 
(२०।३।१३)

-:( पानवठा ):-


जीवन हे एखाद्या 
पानवठ्यासारख असत 

क्षणभर विसावा घ्यावा 
पाणी चाखुन तृप्त व्हाव 
आणि पुन्हा आपल्या सरतेपोटी 
पंखात आभाळ भराव 

एका नव्या दिशेच्या शोधासाठी 

कविकुमार - 
(३।४।१३)


-:( जीवनाचे तरंग ):-



जीवन म्हणजे एकाच जलपृष्ठावरील नाना तरंग 

काही सुखाचे तर काही दुःखाचे तरंग 
सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख दडल असत 

ज्या सुखासाठी जीवनाशी झगडतो 
त्यातुन निष्पन्न माञ दुःखच हाती लागत 

अपेक्षांच्या ओझ्याखाली नकळत मीळनार दुःख 
हे सुखापेक्षा जास्त तीव्र वाटत 

पन ईथे सुखाला पुर्णपने उपभोगन्यापेक्षा 
दुःखाला कवटाळन्यातच जीवन व्यतीत करन 
आपन स्वतःच पसंत करतो 

आजचा अत्ताचा क्षण माझा समजुन जगण्यापेक्षा 
कालच्या आठवनी आणि उद्याची चिँता 
यातच तो क्षण खर्च होतो 

हाती काल नाही म्हणुन रडायच 
उद्या केव्हा उगवेल म्हणुनही रडायच 
आणि आज वाया गेला म्हणुनपन रडायच 

आयुष्याचा तरंग जेव्हा नाहीसा व्हायला लागतो 
तेव्हा समजत "जीवन खुप सुंदर होत ! 
मला ते अनुभवताच नाही आल " 

कविकुमार - 
(२८।३।१३) 

Monday, 18 March 2013

-:( माझ आयुष्य दिल असत ):-


अस म्हणतात सोडुन गेलेले 
नंतर एक चांदणी बनतात 
दूरूनच का होईना ते 
आपल्यावर नजर ठेवत असतात 

रोज रात्री जागुन बाळा 
मी तुला शोधत असतो 
डोळ्यात तुझी प्रतीमा ठेवुन 
चांदण्यांना ओळख विचारत असतो 

मनापासुन सांगतो लाडो 
तुझी खुप आठवन येते 
आधी मधी स्वप्नात माझ्या 
कधी कधी डोकावुन जाते 

मध्येच एक तारा तुटतो 
आणि अचानक नाहीसा होतो 
लपंडावाचा खेळ असा 
रोजच नवा साजरा होतो 

तू नाहीस पन बरोबरचे 
ते क्षण फक्त वाट्यात आहेत 
दिवस कितीही लोटले तरी 
आठवनी तुझ्या ताज्याच आहेत 

जान्याआधी फक्त एकदा 
मला काही सांगीतल असत 
देवाला सांगुन मी तुला 
माझ आयुष्य दिल असत 

माझ आयुष्य दिल असत . . ।। 

कविकुमार - 
(१७।३।१३)



Wednesday, 13 March 2013

-:( गुदमरलेल फुल ):-

आठवांच्या हिँदोळ्यावर 
मन माझ झुलत होत 
तू दिलेल नाजुकस फुल 
आज वहीत गुदमरत होत 

फुल जेव्हा नजरेत आल 
तो क्षण पुन्हा आठवला 
स्पर्श तुच्या नाजुक ओठांचा 
आज त्यावर जानवला 

सुगंध त्या फुलाचा 
आजही मंद येत होता 
रंग तुझ्या नाजुक भावनेचा 
आजही त्यावर फुलत होता 

हळव्या क्षणांची काही पाणे 
आजही वहीत ठळक आहेत 
फुल नाही पन विखुरलेल्या 
पाकळ्या आजही साबुत आहेत 

वहीची पाण चाळताना 
पापनी माझी पाझरली 
कटाक्षाची नाजुक झलक 
आज उगाच आठवली 

कुठेतरी दुर असाच मी
तुझ्या स्मरणात असेल 
शक्यता तुला विसरण्याची 
फक्त माझ्या मरणात असेल 

कविकुमार - 
(४।३।१३)


Friday, 1 March 2013

-:( मी देव शोधला ):-



मी गंध शोधला जो 
त्या अत्तरात नाही 
मी देव शोधला जो 
त्या पत्थरात नाही 

मी रंग शोधला जो 
त्या इंद्रधनुत नाही 
मी भक्त शोधला जो 
त्या मंदिरात नाही 

मी श्वास शोधला जो 
त्या काळजात नाही 
मी राग शोधला जो 
त्या संगीतात नाही 

मी संत शोधला जो 
त्या बंधनात नाही 
मी अंत शोधला जो 
त्या जीवनात नाही 

कविकुमार - 
(२३।२।१३)