Friday, 9 November 2012

-:[ उगाच मन सुखावते ]:-


तुझ माझ्याशी नात 
अस कस हे आहे ? 
कोण आहे तुझा मी 
माझी कोण तु आहे ? 


छीटकारतो तुला मी 
वेदना मलाच होते 
पाहतोच सुख तुझे 
पन दु:ख मलाच होते 


दुरव्यातही तुझीच आस 
एकांतही तुझाच भास 
लागलेली ठेच मला अण् 
फुंकर म्हणुन तुझाच श्वास 


जवळीक देइल वेगळेच वळन 
मला याचीच भिती वाटते गं 
दुरच सही, पन सुखी राहू 
आता असेच मला वाटते गं 


जाता जाता फक्त आता 
इतकेच मला सांगशील का ? 
या नात्याला मैञी म्हणुन 
नाव पुरेस नव्हतच का ? 


हार माझी मान्य परी 
तु माञ जीँकलीच नाहीस 
किमान माझी मैञी तरी 
तुतर समजु शकलीच नाहीस 


वचन माझे तुटनार नाही 
याद तरी तुलाच पुकारते 
जीँकुनही हार मानन्यास 
आज उगाच मन सुखावते 


आज उगाच मन सुखवते . . . । 


-कविकुमार 
[१२।८।२०१२ , १०:४०PM ]


-:( अंधार ):-



गजल 



रातीस का मिळाला अंधार वाटणीला 
हे भाग्य लाभलेले माझ्याच चांदणीला 


जिँकून हारलेला प्रत्येक थेँब माझा 
आलाच पूर एसा भेटून पापणीला 


एकांत झोपनारा तो चंद्र सोबतीला 
तारेच फक्त होते आकाश राखणीला 


या साखरात शाई पाहून धंन्य झालो 
लिहीण्यास कागदावर दे साथ लेखणीला 


हा गंध सोनियाचा होता ' कुमार ' त्यांचा 
अजन्म सोबतीने राहिल 
राखणीला 


- कविकुमार 

[ १।८।२०१२ , १२:३३AM ] 

"लाँजीक"


आपन प्रत्येक गोष्टीत नेहमीच 
"लाँजीक" का शोधत असतो ? 


काही अनलाँजीकल गोष्टिँमध्ये 
फक्त आनंद शोधावा 


जीवन आधीक सुंदर वाटत 


-कविकुमार 
[३१।७।२०१२ , ५:५६PM]

नशीब :-


नशीब , नशीब म्हणजे काय असत ? 


आपनच आपल्या कृतीने लिहीलेल 
आपल्याच भविष्याच पुस्तक 


जी माणसे विचारांनी तेजस्वि असतात 
त्यान खुप काही चांगल मीळत सुद्दा 


विचार आणि कर्म वाईट 
त्याचे भविष्यही वाईटच मार्ग पकडनार 


मग मनासारख घडल नाही की 
पुन्हा नशीबाला दोष देनार 


पन एक गोष्ट लक्षात ठेवा 
हस्तरेषांहुन जास्त हस्तकर्तुत्वावर विश्वास ठेवा 


आयुष्य खुपच सुंदर आहे 
भविष्य आपल्याच हातात आहे 


- कविकुमार 
(२५।७।२०१२)

-:( पूर ):-


गजल 


यादेस आज तुझीया भलताच नूर आला 
मीटता चुकून डोळे स्वप्नास पूर आला 


तालास साथ देण्या कंठात प्राण नाही 
कामास आज माझ्या परकाच सूर आला 


छायेस शोधताना चटके उन्हात बसले 
सुर्यासही पहा त्या ग्रहनात ऊर आला 


देतास घाव मजला केला प्रयास त्यांनी 
भोगावया गुन्ह्याला भलता चतूर आला 


बघ सोनिया कुणाची प्रश्ने 'कुमार' पुसतो 
या जिँदगीत माझ्या सल्ला फितूर आला 


-कविकुमार 
(२२।७।२०१२ , १२:३३ AM)



-:( परोपकार ):-







इतरांना सुगंध देन्याकरता 
का फांदीपासुन तुटाव लागत ? 
इतरांना प्रकाश देन्याकरता 
का वातीला जळाव लागत ? 

काळोखाची राञ एकटी 
का चँद्राला जागाव लागत ? 
इच्छा माझी पुर्ण कराया 
त्या ताऱ्‍याला तूटाव लागत 

याद कुणाची येता मजला 
का आश्रुंना ओघळाव लागत ? 
तहान माझी होन्यासाठी 
रोज नदीला वहाव लागत 

राञीमागुन दिवस उगवला 
का सुर्याला तळपाव लागत ? 
श्वास माझा होन्यासाठी 
उगा हवेला पळाव लागत 

जीवनाची जिंकन्या लढाई 
क्षणा क्षणाला लढाया लागत 
निसर्ग वेडा मला सांगतो 
परोपकाराने जगाव लागत 

-कविकुमार 
(२४।६।२०१२, 1:18AM)

Friday, 10 August 2012

-:( अट्टहास ):-

गजल

दडवला उशाशी तुझा ध्यास होता
तुझे प्रेम होते की आभास होता ?

कशालास तु सोडीलेस हाथ माझे ?
अरे ठेवीलेला तो विश्वास होता

तुझ्या आठवांचा ना सुकला झरा
कसा कोँडलेला तुझा श्वास होता ?

मनालाच मी तर किती सावरावे ?
अनावर कसा हाच हव्यास होता ?

अरे सोनियाच्या 'कुमारास' सांगा
तीला मीवन्यासाठीच हा ध्यास होता


-कविकुमार
(७।७।२०१२ , १०:३२PM)